भिगवण: प्रतिनिधी
नुकताच मोठा गाजावाजा करून घेतलेली फॉर्च्युर्नर गाडी आता रीलस्टार प्रतीक शिंदेसाठी अडचणीचीठरली आहे. गुरुवारी सायंकाळी या गाडीने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे भिगवण परिसरातअपघात झाला. या अपघातात तब्बल तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवानेजीवितहानी टळली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
फिर्यादी निखील बाळासाहेब होले (रा. अकलूज, वय 35) हे आपल्या हुंदाई क्रेटा (एम.एच. 45 ए.यु. 9779) गाडीतून प्रवास करत होते. सायं. पाचच्या सुमारास मदनवाडी, सकुंडे वस्ती जवळील ऑस्करवाडीमिसळ हॉटेलसमोर, मागून भरधाव आलेली टोयोटा फॉर्च्युर्नर (एम.एच. 42 बी.एस. 0111) जोरातधडकली.
ही गाडी चालवणारा दुसरा कोणी नसून रीलस्टार प्रतीक शिंदे (रा. भादलवाडी, ता. इंदापूर, वय 24) होता. धडकेचा जोर एवढा होता की क्रेटा पुढे असलेल्या मारुती वॅगनर (एम.एच. 12 एक्स एम. 3816) वरआदळली. काही क्षणांत तीनही गाड्या एकमेकांना आपटून मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाल्या.
या अपघातात जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याघटनेवरून भिगवण पोलीस ठाण्यात गु.र. क्र. 229/2025 दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीकशिंदेवर भारतीय न्याय संहिता कलम 281, 324(4) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गतगुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा उगले (ब. नं. 2637) करीत आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच घेतलेली फॉर्च्युर्नर अशा प्रकारेअपघाताला कारणीभूत ठरल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. “लोकप्रियतेच्या नादात फिल्मीस्टाईलने गाडी चालवण्यावर आळा बसलाच पाहिजे,” अशी चर्चा स्थानिकांमध्ये रंगताना दिसत आहे.


0 Comments